धाराशिव, (जिमाका) :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातर्फे समता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.10 ते 25 एप्रिल या कालावधीत समता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.
समता पंधरवड्यात 11 वी आणि 12 वी विज्ञान शाखेतील तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम 2023-24 मधील सर्व प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तालुका व महाविद्यालय निहाय संख्यात्मक माहिती समानसंधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय तसेच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहेत.
समता पंधरवड्यात सीईटी देणारे विद्यार्थी डिप्लोमा तृतीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज देखील भरण्यात येऊन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी संबंधित महाविद्यालयातील समानसंधी केंद्रामार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे.
समानसंधी केंद्राच्या माध्यमातून सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज जमा करण्यात येणार असून प्राप्त अर्जावर तात्काळ कार्यवाही करुन वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जात पडताळणी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी,सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे व या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *