धाराशिव, (जिमाका) :- मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये व सामान्य रुग्णालये एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या अर्थसहाय्यातून उन्नती करण्याबाबतची व्हिडीओ कॉन्फरन्स सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत व मित्राचे सीईओ प्रविणसिंह परदेशी,आरोग्य आयुक्त व जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्यासोबत आज १२ फेब्रुवारी रोजी बैठक झाली.
यामध्ये राज्य शासनाने देशपातळीवर ७ धोरणात्मक निर्णय घेतल्याने एशियन डेव्हलपमेंट बँकेने एकूण ४ हजार कोटी रुपयांपैकी १२०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता राज्य शासनास देण्याचे मान्य केले.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी धाराशिव या आकांक्षित जिल्ह्यातील रुग्णांच्या अडचणीबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत केले.प्राप्त निधीतून ५०० खाटांचे नवीन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जवळ-जवळ ६७ हजार चौ.मिटर जागेवर बांधकाम कर्मचारी निवासस्थानासह टाईप प्लॅनप्रमाणे बांधकाम करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
त्यानुसार राज्य शासनाची उपलब्ध कुष्ठधामाची २० एककर जागा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या सूचनेनुसार लगेच देण्याचे मान्य केले.या जागेची पाहणी ९ फेब्रुवारी रोजी मित्राचे सीईओ प्रविणसिंह परदेशी यांनी करुन जागा योग्य असल्याचेही मान्य केले.
याकरीता लागणारे एकूण ३५० कोटी रुपये इतका निधी एशियन डेव्हलपमेंट बँकच्या अर्थसहाय्यातून देण्याचेही मान्य करण्यात आले.याकरीता आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *